कोणासी न कळे हा पंढर
3607.
कोणासी न कळे हा पंढरीचा राणा । केली विवंचना लग्नाची ते ॥१॥
सहपरिवार आपण निघाला । लग्नाचा सोहळा करीतसे ॥२॥
एका जनार्दनी करुनि पाणिग्रहण । निघाला तेथोनिया ॥३॥