पोटींचे बाळ अवगुणी व
1920.
पोटींचे बाळ अवगुणी वोखटें । परी मायबाप स्नेहो मोठें ॥१॥
तयापारी उदरा आलो जी स्वामी । अवगुणांच्यापरी नुपेक्षा तुम्ही ॥२॥
गुण नाही तेथे कर्म कैंचे धड । परी मायाबाप वाटतसे कोड ॥३॥
एका जनार्दनी उद्भव साचे । म्हणोनि हरिदासा कौतुक त्यांचे ॥४॥
