वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 7. वाराचे अभंग › 2. सोमवारचे अभंग

आहा आहा रे भाई प्रथम

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073668 · अभंग क्र. १०

10.
आहा आहा रे भाई प्रथम नमू तो विनायक ।
ठेवूनि गुरुचरणी मस्तक । वदेल प्रासादिक । वाणी हरीहरांचे पवाडे ॥१॥
माझी ऐसी ब्रीदावळी । दासे दासात्वे आगळी ।
पान्हेरीन मार्ग मळी । जीवन घ्या रे कापडी हो ॥२॥
जे सीतळाहूनी सीतळ । पातळाहूनी पातळ
प्रेमामृत रसाळ ते आधी सेवा हो भाग्याचे नु ॥३॥
जिंकाल तरी जिंका अभिमान । दवडाल तरी दवडा लज्जा आधी मान ।
धराल ते धरा शंभूचे ध्यान । दावाल पण ऐसा दावा तो ॥४॥
काळ घेऊ नेदी वाव । आला तो घाव डाव ।
शुध्द सत्वी राखोनि भाव । म्हणा महादेव हरहर वाणी गर्जो घ्य ॥५॥
पराविया नारी माऊलीसमान । परधनी बाटो नेदी मन ।
जीवित्व ते तृनासामान । स्वामीकाजी जाण शूर म्हणो तया आम्ही ॥६॥
शक्ती वेचाविया परउपकारा । खोटे खोट्याचा पसारा ।
सत्य ते भवनदीचा तारा । आळस तो न करा येथे आले हो सांगतो ॥७॥
व्रत करा एकादशी सोमवार । कथा पूजन हरिजागर ।
पुण्य ते असे गाता नाचता फार । पुन्हा बोलीला संसार नाही नाही सत्यत्वे ॥८॥
संग संतांचा करिता बरवा । उत्तमोत्तम कीर्तीचा ठेवा ।
पंथ तो सुपंथे चालावा । उगवा वासना लिगाड ॥९॥
तुका चालवितो कावडी । प्रवृत्ती निवृत्ती चोखडी ।
पुढती पुढती अधिक गोडी । भरुनी कळस भजन आवडी ।
केशवदास नटतसे ॥१०॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग