सगुण स्वरुप तुमचे हर
389.
सगुण स्वरुप तुमचे हरी ।
शोभेले ते विटेवरी ॥१॥
तेणे लागली टकमक ।
डोळिया नावडे आणिक ॥२॥
मनाबुध्दीसीही भुली ।
इंद्रिये गुंफोनि राहिली ॥३॥
निळा म्हणे तनुप्राण ।
गेली आपणा विसरोन ॥४॥
389.
सगुण स्वरुप तुमचे हरी ।
शोभेले ते विटेवरी ॥१॥
तेणे लागली टकमक ।
डोळिया नावडे आणिक ॥२॥
मनाबुध्दीसीही भुली ।
इंद्रिये गुंफोनि राहिली ॥३॥
निळा म्हणे तनुप्राण ।
गेली आपणा विसरोन ॥४॥