वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 44. श्रीकृष्णमाहात्म्य - अभंग २७२ ते ३१७

तिही त्रिभुवना ज्याच

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087486 · अभंग क्र. २८९

289.
तिही त्रिभुवना ज्याची सात्त वाहे । तो चोरी करिताहे घरोघरी ॥१॥
न कळे न कळे लाघव तयाचे । ब्रह्मादीक साचे वेडावती ॥२॥
वेद शास्त्र श्रुती कुठित पै होती । तया गौळणी बांधिनी धरुनिया ॥३॥
योग मुद्रा साध्न योगी साधिताती । तयांसि नाहे प्राप्ति हेंचि रुप ॥४॥
ते बाळरुप घेउनि वोसंगा । हालविती पई गा बाळकृष्णा ॥५॥
जयाचेनि होय तृप्ति पै सर्वांसी । तो मागे यशोएसी दहींभात ॥६॥
दहींभात लोनी खाउनी न धाय । घरोघरी जाय चोरावया ॥७॥
एका जनार्दनी न कळे वैभव । दावितसे माव भोळ्या जना ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग