वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 44. श्रीकृष्णमाहात्म्य - अभंग २७२ ते ३१७

रखितो गोध्नेआं मनाचे

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087480 · अभंग क्र. २९०

290.
रखितो गोध्नेआं मनाचेनी मने । न पुरे अवसरु धावण्यां धावणें ।
कुंठित जाहली गति पवनाची तेणे । तो हा नंदाचा नंदन यशोदेचें तान्हें ॥१॥
देखिला देखिला मंडित चतुर्भुज । वैकुठींचा भूपति तेजःपुंज ।
पहातांचि तय नावडे काही दुजे । ऐसे लाघव याचे सहज ॥२॥
चित्त चैतन्य पडिली मिठी । कामिनी मनमोहना जगजेठी ।
तुझ्या वेधे ध्यानस्थ धुर्जटी । ऐसा गोवळु योगीयांसीनोहे भेटी ॥३॥
एका जनार्दनी शब्दवेगळा । आंगमांनिगमां कांही न काळे लीळा ।
सोहं कोहं शब्दावेगळा । पहा पहा परब्रह्मा पुतळा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग