राजा जाय तिकडे ऐश्वर
289.
राजा जाय तिकडे ऐश्वर्य संपत्ती ।
वैभवे चालती समागमे ॥१॥
वसे वनामाजी तेथे सर्व सिध्दी ।
घेऊनि समृध्दी वसतीपाशी ॥२॥
नाही उणे धनावस्त्रा आणि भूषणा ।
अन्ना काष्ठा जीवना तृणा सैन्या ॥३॥
निळा म्हणे देवा तुम्ही लक्ष्मीवर ।
उभे कटी कर जयापाशी ॥४॥
