नित्य सारुं हरीकथा ।
217.
नित्य सारुं हरीकथा । तेथे काळ काय आता ॥1॥
वनवासी का धाडिले । कृपाळे बा हो विठ्ठले ॥2॥
आशा मनशा तृषा तिन्ही । ह्या तो ठेविल्या बांधोनि ॥3॥
काम क्रोध विषय झाले । हे तो मोहोनि राहिले ॥4॥
अवलोकूनि कृपा दृष्टि । जनी म्हणे देंई भेटी ॥5॥
