वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १३. करुणापर अभंग व देवापाशी मागणें

जिही भाव धरिला ठायी

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088858 · अभंग क्र. ५६९

569.
जिही भाव धरिला ठायी ।
बुडी दिधली तुमच्या पायी ।
त्यासी करुणेची करुनी साई ।
आपणापाशी बैसविले ॥१॥
प्रल्हादा संकटी रक्षिले ।
ध्रुवासी अढळपदी बैसविले ॥
उपमन्या नेउनिया रक्षिले ।
क्षीराब्धी वैभव देउनी ॥२॥
उध्दवासी ब्रम्हरस पाजिला ।
अर्जुना निजबोध अर्पिला ।
दौपदीचा लळा पाळिला ।
वस्त्राभरणे पुरविली ॥३॥
गौळणींचे प्रिय संवाद ।
नित्य भक्षणे त्यांचे दुग्ध ।
गोवळांसवे हुंबरी साद ।
हमामा हुतुतु खेळणे ॥४॥
जिही तुमचे धरिले प्रेम ।
आवडी वदनी गाईले नाम ।
त्यांचा करुनिया संभ्रम ।
निजानंदा पात्र केले ॥५॥
नामदेवा ज्ञानदेवा ।
निवृतित्तनाथा चांगदेवा ।
एकोबा तुकोबाचिया भावा ।
तैसेचि वर्ता श्रीहरी ॥६॥
निळा म्हणे मी तो दीन ।
सकळ संतांचा चरणरेण ।
तुमच्या स्तवनी ठेविले मन ।
येईल चित्ता तैसे करा ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग