ऐक्य ते जालिया मीतूं
2118.
ऐक्य ते जालिया मीतूंपण नाही । गौरव हा कांही नाही नामी ॥१॥
नाही चतुर्दल तुर्याही उन्मनी । स्वयंभ ती खाणी उभी उसे ॥२॥
चित्त जडलिया तेथे काय उणें । लज्जित साधने होती देखा ॥३॥
एका जनार्दनी नाही मीतूंपण । व्यापक तेंजाण सर्वांठायीं ॥४॥
