वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ८, श्री निवृत्ती प्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७२१ ते ७५८

देखोनी पूजावया गेले

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074513 · अभंग क्र. ७५५

755.
देखोनी पूजावया गेले द्वैतभावो ।
तेथे एक उपदेशी श्रीगुरूरावो ॥१॥
द्वैतभावो नाशिला माझा द्वैतभावो नाशिला ।
पूजा उद्वंस केला ते ब्रह्ममय ॥२॥
रखुमादेविवरु देखण्या वेगळा देखिला ।
सगुण निर्गुण जाला बाईये वो ॥३॥

अर्थ :
जेंव्हा मी पूज्य पूजक भाव धरून ईश्वराचे पूजन करावयास निघालो तेंव्हा वाटेत श्रीगुरू भेटले. त्यांनी भेटल्याबरोबर मला आत्मज्ञानाचा उपदेश केला. तेंव्हा माझा द्वैतभाव नाहीसा होऊन गेला. त्यामुळे पूजा करण्याच्या दृष्टीने जी काही सामुग्री मी जमवली होती. तिचा विध्वंस होऊन ती सर्व ब्रह्मरूप झाली. याप्रमाणे दृश्य, द्रष्टाभावातीत असणारे रखुमाईचे पती जे श्रीविठ्ठल तेच सगुण व निर्गुण झाला आहेत. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग