वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ८, श्री निवृत्ती प्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७२१ ते ७५८

मजमाजी पाहता मीपण हर

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074494 · अभंग क्र. ७५४

754.
मजमाजी पाहता मीपण हरपले ।
ठकलेंचि ठेले सये मन माझे ॥१॥
आत विठ्ठलु बाहेर विठ्ठलु ।
मीचि विठ्ठलु मज भासतसे ॥२॥
मीपण माझे नुरेचि काही दुजे ।
ऐसे नाही केले निवृत्तिराजे म्हणे ज्ञानदेवो ॥३॥

अर्थ :
मी आपल्या आत्मस्वरूपाविषयी विचार करू गेले असता विचार करणाऱ्याचा मीपणाच नाहीसा होऊन जातो. त्यामुळे आत बाहेर मीही सर्वत्र एक विठ्ठलच आहे असे ज्ञान होते. त्याठिकाणी त्या परमात्म्याहून मी वेगळा आहे ही द्वैत बुद्धी राहात नाही. अशी माझी स्थिति श्रीगुरूानवृत्तिरायांनी केली असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग