धीर धरी सत्य हे तो न
1929.
धीर धरी सत्य हे तो नारायणा | शुद्ध आचरणा न सांडावे ॥१॥
लौकिकाची कांही न धरावी लाज | हेंचि निज काज साधावे ते ॥२॥
दंभ अभिमान सर्व त्यजोनिया | शरण त्या सखिया जावे आता ॥३॥
निंदा करिती तो मानावा आदर | स्तुति ते उत्तर नायकावे ॥४॥
न धरावी चाड मानसन्मानाची | आवडी भक्तीची रूढवावी ॥५॥
नामा म्हणे हेंचि रूढवावे मानसी | क्षण एक नामासी विसंबू नये ॥६॥
