वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › १, अद्वैत अभंग ४७५ ते ५६४

उत्तम ने परी उभविले

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074447 · अभंग क्र. ५३३

533.
उत्तम ने परी उभविले मनोहर ।
दीपकावीण मंदीर शोभा न पवे बापा ॥१॥
धृतेंवीण भोजन तांबूळेंवीण वदन ।
कंठेवीण गायन शोभा न पवे बापा ॥२॥
सुंदर आणि रमण जरी होय तरुणी ।
पुरुषावीण कामिनी शोभा न पवे बापा ॥३॥
दिधल्यावीण दाता श्रोत्यावीण वक्ता ।
वेदावीण पंडित शोभा न पवे बापा ॥४॥
ज्ञानेश्वर सांगे अनुभवीया अंगे ।
नुसता बोले वागे शोभा न पवे बापा ॥५॥

अर्थ :
उत्तम घरांत रात्री दिवा, जेवणांत तूप, तोंडात विडा गाणाऱ्याला आवाजाची सहाय्यता, तरुण स्त्रीला पति, दात्यास दान, वक्त्यास श्रोते, पंडितास वेदाध्ययन वगैरे गोष्टी नसतील तर त्या जशा शोभा देत नाही. निरूपयोगी ठरतात. त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगणाराही अनुभव नसल्यास व्यर्थ ठरतो. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग