मायेचे भूररे रज तम स
677.
मायेचे भूररे रज तम सात्विक | रामनाम एक सोडवणे ॥१॥
राम हेचि स्नान राम हेचि ध्यान | नामे घडती यज्ञ कोटी देखा ॥२॥
न लगती साधन नाना मंत्रांचा विवेक | रामनाम मुखे घेई का रे ॥३॥
नामा म्हणे श्रीराम हेचि वचन आम्हा | नित्य ते पौर्णिमा सोळा कळी ॥४॥
