रासक्रीडा खेळ खेळॊनि
172.
रासक्रीडा खेळ खेळॊनिया श्रीहरी येती परोपरी गोकुळासी ॥१॥
न कळेची कवणा कैसे हे विंदान । वेदादिकां मौन पडिलेंसे ॥२॥
ते काय कळे आणिकां जीवांसी । ऋषी मुनी तापसी धुंडीताती ॥३॥
एका जनार्दनी ऐसा खेळे खेळां । परब्रह्मा पुतळा नंदाघरीं ॥४॥
