वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 144. संत महिमा

वैष्णवामाजी एक बळी |

🙏 4. संत नामदेव · ABH-083223 · अभंग क्र. ८५९

859.
वैष्णवामाजी एक बळी | पृथु जाला दुजा महीतळी |हरि नांदे प्रल्हादाजवळी | नारदे वनमाळी दान घेतला ॥१॥
बिभीषणे पूजिला लंके हरी | भीष्मे देखिला द्वारकेभीतरी |अर्जुने केला साहकारी | सारथि हरी पांडवांचा ॥२॥
उद्धवे तप केले समर्थ | अक्रूर नित्य वंदनार्थ |गाई गोपिका गोपाळात| तो स्तन पीत यशोदेचे ॥३॥
नंदा वसुदेवा लाधले | बळि देवे ऐसेचि पुण्य केले |उग्रसेने तप साधिले | रत्न साधिले रुक्मिणीने ॥४॥
गरुड हनुमंत शेषादिक नित्य जाले हरिचे सेवक |चरणीच्या उदका शिवादिक | नित्य मस्तक खालाविती ॥५॥
ऐसा दुर्लभ हरीराजा | वर्णिता होती चतुर्भुजा |जड जीवा तारिल केशवराजा | उभारोनि भुजा सांगे नामा ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग