वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ४. सार्थ अभंग १५०१ ते २०००

पडोनिया राही । उगाच

🙏 3. संत तुकाराम · ABH-080196 · अभंग क्र. १८५७

1857.
पडोनिया राही । उगाच संताचिये पायी ॥१॥
न लगे पुसणे सांगावे । चित्त शुद्ध करी भावे ॥धृपद॥
सहज ते स्थिति । उपदेश पर युक्ती ॥२॥
तुका म्हणे भाव । जवळी धरूनि आणी देव ॥३॥

अर्थ :
अरे नरा, संतांच्या पायाजवळ उगाच पडून राहा. त्यांना ज्ञानासंबंधी काही पुसावे, सांगावे लागत नाही संतांचे ठिकाणी निष्ठा ठेवून प्रथम चित्ताची शुध्दता कर. ते संत तुझा उत्कृष्ट अधिकार पाहून आपोआप ब्रम्‍हज्ञानाचा उपदेश अनेक युक्ति - प्रयुक्तींनी करतील. तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे संतांवर विश्वास ठेवला तर तो भक्तीभाव देवालाही जवळ आणतो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग