ॐ कार स्वरुप सदगुरु
665.
ॐ कार स्वरुप सदगुरु असंग । अक्षय अभंग पांडुरंग ॥१॥
नसे ज्याचा ठायी द्वैतद्वैत भाव । ब्रह्मा स्वयमेव पाडूरंग ॥२॥
मस्तक हे माझे तयांचे चरणी । असे जनी वनी पांडुरंग ॥३॥
सदसदभाव हे नसती ज्यांचे ठायी । नित्य तो मी गाई पाडुंरंग ॥४॥
गुरुराज माझा दीनांचा दयाळ । तो डीमायाजाळ पांडुरंग ॥५॥
रवी शशी दीप्ती जेणे प्रकाशती । तो ही तेजमुर्ती पांडुरंग ॥६॥
वेद जयालागीं नित्य वाखाणिती । तो हा वेदमुर्ती पाडुरंग ॥७॥
श्रीमान हा माझा सदगुरु समर्थ । देई मोक्ष स्वार्थ पांडुरंग ॥८॥
पांचा भुतांची जो करितो झाडणी । तो हा ज्ञानखाणी पांडुरंग ॥९॥
डुरकणी देई मोह पंचानन । करी त्या हनन पांडुरंग ॥१०॥
रंगे चित्त माझे तयाच्या स्वरुपी । असे आप आपी पाडुरंग ॥११॥
गर्व अभिमान सोडावा समूळ । भेटे तो दयाळ पाडुरंग ॥१२॥
महामाया एके क्षणांत निरसी । सुखाची पै राशी पाडुरंग ॥१३॥
हाव ही धरी जो सदगुरुपायाची । इच्छा पुरवी त्याची पांडुरंग ॥१४॥
राजा त्रैलोक्याचा गुरुराजस्वामी । वसे अंतर्यामी पाडुरंग ॥१५॥
जायां पुत्र धन तयासी अपील । सर्वस्वे रक्षील पांडुरंग ॥१६॥
यमाची जाचणी तयासी चुकली । गुरुमुर्ति भेटली पाडुरंग ॥१७॥
प्रभा हे जयाची पसरली जनी । चिदरुपणाची खाणी पाडुरंग ॥१८॥
भुतळीं; या नसे दुजा कोनी ऐसा । भक्तांचा कोंवसा पाडुरंग ॥१९॥
नेई भक्तांसे जो आपुल्या समीप । तो हा मायाबाप पांडुरंग ॥२०॥
इति कर्वव्याताहीच दासालागीं । सेवावा हा जगी पाडुरंग ॥२१॥
तीकडी सांखळी त्रिगुनाची तोडी । भवातूनि काढी पाडुरंग ॥२२॥
उपमा तयासी काय देऊम आता । सकाळार्थ दाता पाडुरंग॥२३॥
परोपकारालागीं अवतार केला । आनंदाचा झेल पांडुरंग ॥२४॥
नाम हे तयाचे जन्ममरण वारी । भक्ता सहाकरी पाडुरंग ॥२५॥
मन हे जडले तयाचियां पदी । उतरी भवनदी पाडुरंग ॥२६॥
कायवाचामनें स्वरुपी रहावे । नाम आठवावे पाडुरंग ॥२७॥
यम नियम साधी साधन अष्टांग । होईल सर्वांग पाडुरंग ॥२८॥
एका जनार्दनी देह हारपला । होऊनि राहिला पाडुंरंग ॥२९॥
