नामरूप सोय नाही जया
218.
नामरूप सोय नाही जया रूपा । तेंथिलये कृपा खेळो आम्ही ॥1 ॥१॥
आम्हा हेंचि रूप अद्वैत स्वरूप । नाही तेथे कि लाभ कल्पनेचा ॥२॥
ध्येय ध्यान खुंटे प्रपंच आटे । नाम हे वैकुंठा नेतु असे ॥३॥
निवृत्ति साधन वृत्तिच संपन्न । नाम हे जीवन अच्युताचे ॥४॥
अर्थ:
त्याला नामा नाही रुप नाही जो निर्गुण आहे त्या ब्रह्मस्वरुपाच्या कृपेमुळे आम्ही जगतात खेळताना दिसतो.आमच्या साठी हे अद्वैत स्वरुपच महत्वाचे आहे.त्यामुळे मनाला कल्पनेप्रमाणे जाता येत नाही. ह्या नामाचा जप केला ध्येय ध्यान हे जागीच मुरडुन जाते व वैकुंठाची वाट सोपी होते.निवृत्तिनाथ म्हणतात, त्या नामसाधनेचा परिपाठ ठेवला तर आपले जीवनच अच्युतमय होते.
