वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

कल्पना कोंडूनि मन हे

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090064 · अभंग क्र. २१७

217.
कल्पना कोंडूनि मन हे मारिले । जीवन चोरिले सत्रावीचे ॥१॥
साजीव सोलीव निवृत्तिची ठेव । कृष्ण हाचि देव ह्रदयी पूजी ॥२॥
विलास विकृति नाहीपै आवाप्ति । साधनाची युक्ति हारपली ॥३॥
निवृत्ति कारण योगियांचे ह्रदयी । सर्व हरि पाही दिसे आम्हा ॥४॥

अर्थ:
शंकारुपी कल्पनेला मी मनासकट काढुन टाकल्या मुळे लिंगदेहाची सतरावी जीवनकला तोच आत्मा आहे. तोच आत्माराम चोरला. साजीव सोलीव असणारा कृष्ण तोच माझा ठेवा आहे. त्याचीच पूजा मी हृदयात करतो. त्यासाठी कोणत्याही साधनाची गरज राहात नाही त्या मुळे विलास विकृती यांची व्याप्ती उरली नाही.निवृत्तिनाथ म्हणतात, जो परमात्मा योग्यांचे कारण आहे तोच मला जगात सर्वत्र दिसतो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग