पाहो जाता हा न दिसे
1517.
पाहो जाता हा न दिसे ।
झांकोळिला विश्वाभासे ॥१॥
आता पाहो कोणीकडे ।
आड आपणा हा दडे ॥२॥
डाहाळी आड आंबा ।
असोनि न दिसेचि उभा ॥३॥
साखर दिसे खडा ।
गोडी पाहो काणीकडा ॥४॥
निळा म्हणे सोने ।
न दिसे झाकिले भूषणे ॥५॥
1517.
पाहो जाता हा न दिसे ।
झांकोळिला विश्वाभासे ॥१॥
आता पाहो कोणीकडे ।
आड आपणा हा दडे ॥२॥
डाहाळी आड आंबा ।
असोनि न दिसेचि उभा ॥३॥
साखर दिसे खडा ।
गोडी पाहो काणीकडा ॥४॥
निळा म्हणे सोने ।
न दिसे झाकिले भूषणे ॥५॥