वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ११, योग अभंग ३४२ ते ४४४

पश्चिम मार्गी खूण बी

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075122 · अभंग क्र. ३९६

396.
पश्चिम मार्गी खूण बीजे दोन सांजिरी ।
अविनाश ओवरी योगीयांची ॥१॥
त्रिकुट श्रीहाट चंद्रसूर्य जाणा ।
पश्चिम मार्गी खूण याची की रे ॥२॥
ज्ञानदेव म्हणे बीजे दोन बापा ।
पाहे आत्मरूपा तेथ बा रे ॥३॥

अर्थ :
भुवयांच्यामध्ये आतील बाजूस दोन बीजे असलेले अग्नीचक्र आहे. त्याला योगीयांची अविनाश वोवरी म्हणतात. तिची त्रिकुट, श्रीहाट ही स्थाने असन तेथे चंद्रसुर्याच्या तेजाप्रमाणे तेज आहे. याचीच खूण पश्चिम मार्गी आहे. या दोन बीजात्मक अग्नीचक्रांत तुला आत्मरूप दिसेल रे बाबा. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग