भ्रुवामध्ये तेज चंद्
395.
भ्रुवामध्ये तेज चंद्रसूर्यविरहित ।
आदी मध्य अंत संचलेसे ॥१॥
तुर्यारूपे ते सुषम्ना प्रकाशली ।
नवविध अमृतजळी तया तेजा ॥२॥
ज्ञानदेव वदे अष्टांगयोग साध ।
पावाल ब्रह्मपद ह्याचा भेद ॥३॥
अर्थ :
दोन भुवयांमध्ये अग्नीचक्राच्या ठिकाणी चंद्रसूर्याखेरीज जे तेज आहे. ते आदीमध्यांत पसरले आहे तेथे नऊ प्रकारच्या अमृतमय जलामध्ये तुर्यारूपाने सुषुम्ना नाडी प्रकाश करते. तुम्ही योगाभ्यास करा म्हणजे ब्रहारूप व्हाल. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
