करिता भगवद्भक्ती । च
1425.
करिता भगवद्भक्ती । चारी मुक्ति पाया लागती ॥१॥
ऐसा लाभ नाही कोठे । कीर्तनामाजी देव भेटे ॥२॥
योगयाग तप साधन । कासया ते ब्रह्माज्ञान ॥३॥
न लगे तीर्थाचें भ्रमण । सदा ध्यान नारायण ॥४॥
एका जनार्दनी भक्ति । तेणे पावे उत्तम गती ॥५॥
