केधवा सुटेन ऐस जाले
298.
केधवा सुटेन ऐस जाले जीवा । गोवियेले देवा कांही येथे ॥१॥
आता झडकरी धांवे लवकरी । सोडवी बाहेरी मजलागी ॥२॥
प्राण हा कंठी धरीला तुजसाठी । निर्वाण दृष्टी पाहसी काय ॥३॥
चोखा म्हणे वांया चालिलासे वेळ । आला असे काळ निकट दिसे ॥४॥