जाणतसा जरी अंतरीचे ।
665.
जाणतसा जरी अंतरीचे ।
तरी का हो वाचे वदविता ॥१॥
केविलवाणे तुमचे दास ।
देखता उपहास होतील ॥२॥
जग निंदय आधी करा ।
मग तुम्ही धरा निज करी ॥३॥
निळा म्हणे ऐशी रीत ।
नाहीचि शोभत संतांसी ॥४॥
665.
जाणतसा जरी अंतरीचे ।
तरी का हो वाचे वदविता ॥१॥
केविलवाणे तुमचे दास ।
देखता उपहास होतील ॥२॥
जग निंदय आधी करा ।
मग तुम्ही धरा निज करी ॥३॥
निळा म्हणे ऐशी रीत ।
नाहीचि शोभत संतांसी ॥४॥