वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › १, अद्वैत अभंग ४७५ ते ५६४

जयाचिये ठायी नाही मी

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074445 · अभंग क्र. ४८१

481.
जयाचिये ठायी नाही मीतूंपण ।
तेचि सनातन एक ज्ञानी ॥१॥
धैर्याचे मंडप तेचि स्तंभ जाले ।
कोंभ जे निघाले परिणामा ॥२॥
क्षेत्रज्ञ संन्यास घेतला श्रीहरि ।
तेथूनिया दूरी नवजेची ॥३॥
रायाची संगती घडता निमिष ।
तरी होती वश्य अष्टसिद्धी ॥४॥
धाले तेच पूर्ण कीर ब्रह्मानंदे ।
ज्ञानेश्वर बोधे बोधीयला ॥५॥

अर्थ :
ज्याच्याठिकाणी मी तू हे द्वैत भान नाही. तेच मुरलेले ज्ञानी समजावे. ते धैर्यरुप मंडपाचे जणू खांबच होत. त्याच्या रुपाने जणू काय ब्रह्मालाच कोंभ फुटले म्हणावयाचे. त्या ज्ञानवानांच्या ठिकाणी श्रीहरिने क्षेत्रसंन्यास केला आहे. म्हणून त्याला त्या संतांच्या हृदयांतून बाहेर जाताच येत नाही. ज्याप्रमाणे राजाच्या क्षणभर संगतीने अष्टसिद्धीप्रमाणे सर्व लोक अनुकूल होतात. त्याप्रमाणे तेच पुरुष ब्रह्मानंदाने पूर्ण तृप्त आहेत. व तोच बोध मला निवृत्तिरायांनी दिला असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग