(हिंदुस्तानी भाषेतील
3489.
(हिंदुस्तानी भाषेतील अभंग)
मंत्रतंत्र नहि मानत साखी । प्रेमभाव नहि अंतर राखी ॥१॥
राम कहे त्यागे पगहू लागू । देखत कपट अभिमान दुर भागू ॥धृपद॥
अधिक याती कुलहीन नहि ज्यानु । ज्याणे नारायन सो प्राणी मानू ॥२॥
कहे तुका जीव तन डारू वारी । राम उपासिंहु बलियारी ॥३॥
अर्थ :
प्रभू रामचंद्राविषयी जो भक्तिप्रेमभाव आपल्या अंत:करणात राखत नाही तो कितीही मंत्रतंत्र जाणणारा असला तरी आम्ही त्याला मानत नाही. जो मुखाने रामनाम घेतो त्याच्या पायाला आम्ही लागू परंतू ज्याच्या ठिकाणी आम्हाला कपट अभिमान दिसतो आम्ही त्याच्यापासून दूर पळून जाऊ. आम्ही जात कूळ हे काहीही जाणत नाही जो प्राणी नारायणाला जाणतो त्या प्राण्यालाच आम्ही मानतो. तुकाराम महाराज म्हणतात, जो बलवंत अशा रामाची उपासना करतो त्याच्यावरुन आम्ही आमचा जीव तन धन ओवाळून टाकू.
