उठता बैसता खेळता बोल
877.
उठता बैसता खेळता बोलता । चालतांनिजता राम म्हणा ॥१॥
आसनी शयनी भोजनी परिपुर्ण । वाचे राम नारायण जप करी ॥२॥
कार्याकारणी समाधीं उन्मनी । राम ध्यानींमनीं जपे सदा ॥३॥
एकांती लोकांती देहत्यागांअंती । रामनाम वस्ती जिव्हेवरी ॥४॥
एका जनार्दनी वाचे वदे राम । अखंड निष्काम होसी बापा ॥५॥
