तेथे रावणाचा गर्व पर
916.
तेथे रावणाचा गर्व परिहार । पर्णिली सुंदर सीतादेवी ॥१॥
देवी दुंदुभीं वाजविल्या अपार । तेव्हा कळो सरे भार्गवासी ॥२॥
भार्गव पातला आला गर्वराशी । कोणे धनुष्यासी सोडियलें ॥३॥
भंगियेला गर्व तोषला भार्गव । एका जनार्दनी अपुर्व आशीर्वाद ॥४॥
