हरि गाता बरवा ऐकता ब
541.
हरि गाता बरवा ऐकता बरवा | हृदयी ध्याता बरवा बाइयांनो ॥१॥
केशव पै देणे केशव पै घेणे | केशव करणे धंदा आम्ही ॥२॥
चंद्र बिंबाची कुरवंडी ओवाळू श्रीमुखावरी | मदन हा जिव्हारी लाजिन्नला ॥३॥
नामा म्हणे निवविले सकळ इंद्रियाते | म्हणोन त्या केशवाते शरण जावे ॥४॥
