आशा तृष्णा माया नाही
542.
आशा तृष्णा माया नाही लाथाडल्या | म्हणावा तो भला कासयाने ॥१॥
अमृत सेविता मृत्यू पळे दुरी | सुख होय तरी तेंचि नाम ॥२॥
तेंव्हा कोणी तरी धरावा सत्संग | होय पांडुरंग प्राप्ति सर्वा ॥३॥
अविश्वास नर सर्वस्व पतिता | तारिसी अनंता नामा म्हणे ॥४॥
