विसावा विश्वाचा जो प
826.
विसावा विश्वाचा जो प्राण जीवाचा|तोचि नित्य वाचा जपो आम्ही॥१॥
गोविंद वामन भावयुक्त भजन|सर्व जनार्दन हाचि भाव॥२॥
चैतन्य अचिंत्य नाम हेंचि सत्य|नित्यता कृतार्थ विठ्ठलनामें॥३॥
नामा म्हणे उद्धरण आणिक नाठवें|केशवचि सवे पुरे आम्हां॥४॥
