वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(निर्याणाचे अभंग)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079597 · अभंग क्र. ३६२०

3620.
(निर्याणाचे अभंग)
चला जाऊ रे सामोरे । पुढे भेटो विठ्ठल धुरे ॥१॥
तुका आनंदला मनी । कैसा जातो लोटांगणी ।
फेडावया धणी । प्रेमसुखाची आजी ॥धृपद॥
पुढे आले कृपावंत । मायबाप साधुसंत ॥२॥
आळंगिला बाही । ठेविला विठोबाचे पायी ॥३॥

अर्थ :
चला पुढे जाऊ वैष्णवांना भेटू आणि पुढे आलेल्या विठ्ठलाला देखील भेटू. आज हा तुकाराम खूप आनंदला आहे त्याच्या मनात आज खूप आनंद निर्माण झाला आहे. पाहा मी कसा त्यांच्यासमोर लोटांगण घालीत जात आहे. प्रेमसुखाची तृप्ती होण्याकरता मी लोटांगण घेत त्यांच्यापुढे जात आहे. मायबाप कृपावंत साधूसंत हे देखील पुढे आलेले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, मी संतांना माझ्या बाहूने आलिंगन दिले आणि संतांनी मला त्यांच्या पायावर ठेवले.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग