वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 3. ज्ञानकांड रुपके › २६, विरहिणी अभंग ९९६

तुझी आण वाहिन गा देव

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074617 · अभंग क्र. ९९८

998.
तुझी आण वाहिन गा देवराया ।
बहु आवडसी जीवापांसूनिया ॥१॥
कानडिया विठोबा कानडिया ।
बहु आवडसी जीवापांसूनिया ॥२॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलुराया ।
बहु आवडसी जीवापांसूनिया ॥३॥

अर्थ :
हे देवराया मी तुझी शपथ घेऊन सांगतो तू मला माझ्या जीवापेक्षाही अधिक आवडत आहेस. वास्तविक तू भावभक्तिवांचून कळण्यास अत्यंत कठीण असा आहे. म्हणून मला मात्र श्रीविठ्ठला तू अंतःकरणापासून म्हणजे भावभक्तिमूलक आवडत आहेस. माझे पिता व रखुमाईचे पती जे श्रीविठ्ठल मला अत्यंत जीवापासून आवडत आहेत असे माऊली सांगतात. तुझी आण वाहिन गा देवराया ।

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग