वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › १४, कर्मविधी निषेध अभंग ४७२ ते ४७४

पदत्रयादि विलक्षण ना

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075025 · अभंग क्र. ४७४

474.
पदत्रयादि विलक्षण नातळे वर्णावर्ण ।
पंचभूतिकपण नातळे ज्यासी ॥१॥
ते स्वयंप्रमाणे घनावलेनपणे ।
द्वैताद्वैत की तैसे आहे ॥२॥
नामरुपाचा भेद तुटलासे संबंध ।
स्वये निजानंद भोगी बापा ॥३॥
सारूनी लक्ष लक्षण शास्त्राचा उगाणा ।
तेथ वेदादि षड्दर्शना नुमगे पाही ॥४॥
तयामाजी ते असतसे निरूते ।
न चोजवे पंथे नवल ज्याचे ॥५॥
म्हणोनिया परिसा चौंचिची उजरी ।
तेचि निर्विकारी प्रकाशले ॥६॥
निवृत्तिदास म्हणे हा निजभाव ।
बोलो नये ठाव तैसे जाले ॥७॥

अर्थ :
त्या परमात्म्याचे स्वरूप सच्चिदानंदपदांनी बोधन करता येत नाही. त्याला वर्णावर्ण भेद स्पर्श करू शकत नाही. ते पाचमहाभूतापलीकडे आहे. ते स्वयंसिद्ध द्वैताद्वैताच्या पलीकडे आहे. त्याच्याठिकाणी नाम व रूप नसून ते केवळ सत्, चित्त, आनंदरूप आहे. हेच तुझे स्वरूप असल्यामुळे त्याचा आनंद भोगीत राहा. लक्ष, लक्षण, वगैरे विनाकारण शास्त्रांच्या खटपटी सोडून दे अशा कसोटीने ते स्वरूप चार वेद व सहाशास्त्रानांही उमगले नाही. खरोखर ते या सर्वांमध्ये आहे. परंतु यांनी ज्या मार्गानी शोध चालविला त्या मार्गानी ते सापडत नाही. हे आश्चर्य आहे. असे असूनही खरोखर चारी वेदांचा असा थोरपणा आहे की त्यांनी ते स्वरूप असे आहे असे जरी सांगितले नसले तरी ते निर्विकार आहे असे सांगितले. ते स्वरूपच आपण आहो. हे बोलून दाखविता येण्यासारखे नाहीच. परंतु याबद्दल बोलावयाचा झाले तर असे बोलावे लागते असे निवृत्तीदास माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग