वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ३. कृष्णचरित्र

म्हणती आजि वांचिलो ज

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089880 · अभंग क्र. ११७

117.
म्हणती आजि वांचिलो जीवे ।
जवळी श्रीहरी होता सवे ।
तव ते गांईचे मेळावे ।
वाडियाकडे मोहरले ॥१॥
मग ते चालिले गोवर ।
वाजवीत वादये खेळत खेळ ।
शिंगे कहाळा घागरघोळ ।
चांदिवे ध्वज उभारुनी ॥२॥
ऐशिया परमानंदकल्लोळी ।
गाई आलिया वाडिया जवळी ।
तव त्या गौळणी सकळी ।
आलिया दुडिया घेउनी ॥३॥
गौळी वत्सा पाचारिती ।
गोधना दुहावे ते करिती ।
गाई सुरवाडे दुभती ।
वत्सांही पाजिती तृप्तीवरी ॥४॥
संवगडे म्हणती चला घरा ।
जाऊ आता शारंगधरा ।
मग मोहच्छाये मंदिरा ।
चालले गजरे मिरवत ॥५॥
तव त्या तलगा गौळणी नारी ।
नानापरीच्या आरत्या करी ।
घेऊनिया आत्मया श्रीहरी ।
ओवाळिती निजभावे ॥६॥
विचित्र पुष्पांचिया माळा ।
आवडी घालिती हरीच्या गळा ।
ऐसे मिरवित आले राउळा ।
येता यशोदा देखिले ॥७॥
तिणे करुनिया अंक्षवाणे ।
ओवाळिले जिवे मने ।
तव गोवळ बोलति बोलणे ।
जाले अपूर्व वनी ते ॥८॥
निळा म्हणे ते ऐकवया ।
निवाडे बैसली यशोदा माया ।
गोवळ सांगती लगोनि पाया ।
थोर कौतुक देखिले ॥९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग