वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ३. कृष्णचरित्र

अग्नीची व्हावया शांत

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089879 · अभंग क्र. ११५

115.
अग्नीची व्हावया शांती ।
उपाय आहे तुमच्याचि हाती ।
लावोनिया बैसा पाती ।
डोळेचि झांकुनी बळकट ॥१॥
उघडे ठेविता चेतले वन्ही ।
मग तो नाटोपे आम्हा लागुनी ।
सांडील अवघीयांसीच जाळुनी ।
झांका म्हणउनी निज नेत्र ॥२॥
गोवळ म्हणती कैसे डोळे ।
झांकउनी मारवितोसी रे सकळे ।
येरु म्हणे तुम्हा हे नकळे ।
तोटका या काळे ऐसाची ॥३॥
येथे न धरिताचि विश्वास ।
जळाल अवघेही नि:षेश ।
ऐसे सांगोनिया त्यास ।
डोळे निज करे धरविले ॥४॥
मग आपण वाढोनिया श्रीहरी ।
जाहला विराटरुपिया गगनावरी ।
मुख पसरोनिया श्वासेंची करी ।
वोढिल्या अग्निज्वाळा ॥५॥
पोटी घालूनिया दावानळ ।
जाहला पहिल्याचि ऐसा गोपाळ ।
हे देखोनी अवघेची गोंवळ ।
बोटांसंघीं लक्षिता ॥६॥
तया म्हणे उघडा नेत्र ।
ऐकोनी बोलती ते सर्वत्र ।
म्हणती देखिले हे चरित्र ।
तूचि गगनवरी वाढलासी ॥७॥
निजमुखे गिळिले ज्वाळ ।
तूचि तू काळाचाहि काळ ॥
आजी देखिला तुझा खेळ ।
आम्ही आपुल्या निजदृष्टी ॥८॥
निळा म्हणे बोलोनी ऐसे ।
लोळती पायावरी उल्हासे ।
मनी जाणोनिया विश्रवासे ।
हाचि परमात्मा ईश्वर ॥९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग