आम्ही स्वर्ग लोक मान
220.
आम्ही स्वर्ग लोक मानू जैसा ओक । देखोनिया सुख वैकुंठीचे ॥1॥
नलगे वैकुंठ न वांछूं कैलास । सर्वस्वाची आस विठोपायी ॥2॥
न लगे संतति धन आणि मान । एक करणे ध्यान विठोबाचे ॥3॥
सत्य की मायी आमुचे बोलणे । तुमची तुह्मा आण सांगा हरी ॥4॥
जीवभाव आम्ही सांडू ओंवाळूनि । म्हणे दासी जनी नामयाची ॥5॥
