जगलागीं शिणती रात्रं
594.
जगलागीं शिणती रात्रंदिन । यज्ञयागादिकरिता हवन ।
ध्येय ध्यान धारणा अनुष्ठान । साधिती अष्टांग आणि पवन ॥१॥
तो गे माय सोपा केला सर्वांसी । लांचावला देखोनि भक्तीसी ।
उभा राहिला युगे आठ्ठावीस विटेसी । न बोले न बैसे नुल्लंघी मर्यादेसी ॥२॥
एका जनार्दनी कृपेचा सागर । भक्त करुणाकर तारु हा दुस्तर ।
उभा भीवरेचे तीरीं कटी धरुनी कर । जडजीवां दरुशने उद्धार ॥३॥
