काळाचिये लेख । नाही
198.
काळाचिये लेख । नाही ब्रह्माविष्णु मुख्य ॥1॥
युगा एक लव झडे । तोही न सरे काळापुढे ॥2॥
अविद्येने नवल केले । मिथ्या देह सत्य केले ॥3॥
महीपाळ स्वर्गपाळ । तेही ग्रासले समूळ ॥4॥
वर्म चुकली बापुडी । दासी जनी विठ्ठल जोडी ॥5॥