वाढो लागे हरि नंदाचे
225.
वाढो लागे हरि नंदाचे मंदिरी । नाना क्रीडा करी नित्य नवी ॥१॥
देखोनिया चोज भुलल्या नरनारी । देहभावे वरी वोंवाळिती ॥२॥
सांवळे गोजिरे दिसे नेत्रालागी । ह्मणोनि वोसंगी सदा घेती ॥३॥
नाचे उडे बोले मंजुळ बोबडे । तेणे वेदा पडे मौन्य सदा ॥४॥
नित्य नवी लीला दाखवी अपार । मन तेथे स्थिर लांचावले ॥५॥
नामा म्हणे गोप त्यासंगे रतले । प्रेमाने मातले एकसरे ॥६॥
