वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 117. दशावतार - अभंग ३३४४ ते ३३६४

एका अयोध्ये अवतार ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086456 · अभंग क्र. ३३६३

3363.
एका अयोध्ये अवतार । दुजा गोकुळीं निर्धार ॥१॥
एके ताटिका मारिली । एके पूतना शोषिली ॥२॥
एके अहिल्या उध्दरिली । एके कुब्जा पावन केली ॥३॥
एका एकपत्नीव्रत । एक गोपीं ते भोगीत ॥४॥
एक हिंडे वनोवनी । एक हिंडे वृंदावनीं ॥५॥
एके रावण मर्दिला । एके शिशुपाळ वधिला ॥६॥
एके बिभिषणा पाळिले । एके अर्जुना सांभाळिले ॥७॥
एका वहनी हनुमंत । एका गरुड शोभत ॥८॥
एका शोभे धनुष्यबाण । एका काठी कांबळी संपूर्ण ॥९॥
ऎसा भक्तांचा कळवळा । एका जनार्दनी बोधिला ॥१०॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग