यशोदा व्याकूळ जाहाली
116.
यशोदा व्याकूळ जाहालीसे प्राणे । सुखी असो तान्हे वनामाजी ॥१॥
उठती तिडका स्तनी माझ्या फार । लवतसे नेत्र वेळोवेळा ॥२॥
जीव तळमळी दाटे माझा प्राण । केव्हा मी पाहीन पाडसासी ॥३॥
गोकुळींचे जन निघाले सकळ । पाहाताती गोपाळ वनामध्ये ॥४॥
कालिंदीच्या तीरी पडिले सकळ । पाहोनी कोल्हाळ करीताती ॥५॥
कपाळ पिटिती यशोदा रोहिणी । आताम चक्रपाणी कैंचा आम्हा ॥६॥
धांव धांव कृष्णा दावींरे वदना । पाजू आता पान्हा कोणालागी ॥७॥
तुझिया कौतुके कंठी मी संसार । जळते अंतर तुजसाठी ॥८॥
कोणावरी आता घालू अलंकार । बुडाले हे घर माझे आता ॥९॥
नामा म्हणे शोके जाऊ पाहे प्राण । सकळाचे जीवन कृष्णनाथ ॥१०॥
