घालीतसे वेढे दिसतसे
115.
घालीतसे वेढे दिसतसे जळी । आकांत सकळी मांडियेला ॥१॥
गडी रडताती वत्स पळताती । कपाळ पिटिती सकळीक ॥२॥
तुजवांचोनीया रक्षी कोण आह्मा । काय सांगू रामा सकळीक ॥३॥
रुसल्या आमुचे करी समाधान । तुजवीण वन ओस वाटे ॥४॥
आम्हांसाठी तुवा दुष्टासी मारिले । कोण आता लळे पुर-वील ॥५॥
तुजवांचोनिया आह्मी सर्व दीन । न जाऊ येथून गोकु-ळासी ॥६॥
वियोगाने तेव्हा पक्षी रडताती । आता कृष्णमूर्ती कैंची आह्मा ॥७॥
बोलोनिया ऐसे निस्तेज पडती । नदी वाहत होती स्थीरावली ॥८॥
नामा म्हणे होती दुश्चिन्हे बहुत । गोकुळी समस्त विचारिती ॥९॥
