घनाःश्याम मूर्ति नील
543.
घनाःश्याम मूर्ति नीलवर्ण गाभा । कैवल्याची शोभा शोभे बहु ॥१॥
कस्तुरी मळवट चंदनाची उटी । बाहुवटे कंठी गोरेपणें ॥२॥
एका जनार्दनी चरणाची शोभा । अनुपम्य उभा भीमातटीं ॥३॥