वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १३. करुणापर अभंग व देवापाशी मागणें

माझी पूजा हेचि अर्चन

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088847 · अभंग क्र. ५९२

592.
माझी पूजा हेचि अर्चन ।
तुमचे नामसंकीर्तन ।
नेणे करु वेदाध्ययन ।
नेणे आसन योगाचे ॥१॥
म्हणोनि येतो काकुलती ।
अत्यंत मूढ आहे माझी मती ।
नेणे करु तुमची स्तुती ।
अहो जगत्पती पुराणपुरुषा ॥२॥
कैसे होईल ते मी नेणे ।
भूत भविष्य वर्तमाने ।
अल्पबुध्दी माझे जिणे ।
मूढपणे वर्तणूक ॥३॥
यालागी तुमचे धरिले नाम ।
तुमचे स्तवनी ठेविले प्रेम ।
न कळे आणिक न चले नेम ।
साधन दुर्गम मज वाटे ॥४॥
नेणे तीर्था पलाटण ।
नेणे मंत्राचे पुरश्चरण ।
नेणे योगयाग सांख्यज्ञान ।
नेणे करु ध्यान तुमची पूजा ॥५॥
नेणे कैसी माझी करुणा ।
येईल तुम्हा नारायणा ।
नेणे वर्णू तुमच्या गुणा ।
नेणे धारणा व्रतनिष्ठा ॥६॥
नाही वाचासंस्कार ।
नाही घोकिले जी अक्षर ।
नेणे करु यज्ञाचार ।
स्वधर्म तोहि विधियुक्त ॥७॥
निळा म्हणे सर्वापरी ।
आहे मूर्ख मी श्रीहरी ।
ताराल ऐसिया नवल तरी ।
तुमची थोरी प्रगटेल ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग