आणिक न मागे है ब्रीद
1736.
आणिक न मागे है ब्रीद साजे चातका | भूमीच्या उदका न खालवी माथा ॥१॥
आणिका पुढे न गाय हे ब्रीद साजे कोकिळिये | वसंतऋतु स्वये आळवितसे ॥२॥
आणिकापुढे न नाचे हे बीद साजे मयुरा | वर्षला धन सारा वळोनिया ॥३॥
एका लक्ष्मीपतिवांचुनि न बैसे आणिकापुढे | है ब्रीद साजे रोकडे गरुडासी ॥४॥
आणिकांचा पांगिला न करी गा देवा | नामा म्हणे केशवा रंक तुझा ॥५॥
