वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ११, योग अभंग ३४२ ते ४४४

मन हे लावा हे सालयी

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075120 · अभंग क्र. ३९०

390.
मन हे लावा हे सालयी निरूते ।
सहस्र दळावरूते परे जवळी ॥१॥
अनुहात नाद ब्रह्मस्थानी असे ।
तेथे रूप कैसे सांगा मज ॥२॥
ज्ञानदेव म्हणे ते स्वरूप जो जाणे ।
त्यासी शरण होणे अनन्य भावे ॥३॥

अर्थ :
तुम्ही आपले मन परावाणीच्या जवळ असलेल्या सहस्रदळ कमळातील नीलबिंदुच्या ठिकाणी निश्चयाने लावा. ज्या ब्रह्मस्थानी अनुहत ध्वनी योग्याला ऐकु येतो. तेथील रूप कसे आहे ते मला सांगा. ते स्वरूप जाणणाऱ्या पुरुषाला अनन्यभावाने शरण जा. असे माऊली ज्ञानदेव म्हणतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग